अहो साधी भाजी घेताना जरा वजन चुकीचं वाटलं तर अवघ्या अडीच रुपयांसाठी 'प्रश्न तत्वाचा आहे' म्हणून भांडणारी माणसं आपण... नाही नाही, आमचं मुळीच म्हणणं नाही की ते चूक आहे म्हणून! अहो स्वतः कमावलेल्या पैशांचा चुकीचा मोबदला मिळाल्यावर येणारी सहाजिक रिअक्शन आहे ती...! पण गम्मत पहा, तीच चोखंदळ माणसं आपण, एखाद्या मल्टिप्लेक्समध्ये एका तिकिटासाठी अडीचशे रुपये देताना किंवा मूठभर कणसाच्या दाण्यांसाठी चाळीस रुपये मोजताना क्षणभर तरी विचार करतो का हो खरंच? कारण तिथे 'असं का बरं?' असं आपण विचारूच शकत नाही अशी जणू आपली समजूत असते.
आता विवाहसंस्थांचंच घ्या ना !उभ्या आयुष्यभराच्या जोडीदाराच्या शोधासाठी दोन-चार हजार रुपये वर्षाकाठी काही फार आहेत असं नाही म्हणायचं आम्हाला... पण 'नक्की काय मिळणार हो आम्हाला आमच्या पैशांच्या मोबदल्यात?' असं विचारणारे अभावानंच सापडतील. अहो आपण देतो त्या पैशांचा हिशोब विचारणं चूक का आहे?
पण आज सहज नजर टाकलीत आजूबाजूला तर तुम्हाला दिसेल की बहुतेकश्या...अगदी वर्षानुवर्षे चालू असलेल्या विवाह्संस्थांनीदेखील लग्नाचा बाजार मांडलाय!
पूर्वी काळ निराळा होता. बहुतेकसे लोक गावात असत. गाव छोटीशी पण कुटुंबं मोठी. एकाच मोठ्ठाल्या कुटुंबात खूप सारी माणसं असायची. पण शहरीकरणाने परिस्थिती बदलली. सुबत्ता आली पण माणसं दुरावली. इतरांचे सल्ले खासगी आयुष्य मध्ये लुडबुड वाटायला लागली आणि नात्यांमधलं ते जुनं 'आपलं माणूस संपलं'.
आणि म्हणूनच 'आपलं माणूस' ची ही आगळीवेगळी कल्पना... या 'लग्नाच्या बाजाराची संकल्पनाच पूर्णपणे मोडून काढणारी... तुमच्या खिश्याकडे नव्हे तर तुमच्या सोयींकडे पाहणारी... आणि तुमच्या पैशांचा तुमच्याचसाठी सुयोग्य वापर करणारी... एक खरंच आगळीवेगळी विवाहसंस्था... 'आपलं माणूस' !
आणि आमच्या मते पैशांचा योग्य मोबदला म्हणजे 'काहीच पदरात पाडून न घेता त्यासाठी चार पैसे कमी देण्याचं खोटं खोटं समाधान' नव्हे तर 'चार पैसे जास्त गेले तरी चालतील पण पैशांच्या किमतीहून अधिक मोबदला मिळणे' हा आहे. आणि म्हणूनच आम्ही म्हणतो, विचारा... बेधडक विचारा... आणि फक्त इतरांना नाही तर आम्हालाही विचारा... 'नक्की काय मिळणार हो आम्हाला आमच्या पैशांच्या मोबदल्यात?'
आणि आम्हाला खात्री आहे, सरतेशेवटी तुमची निवड निश्चितच सोप्पी झालेली असेल... विवाहसंस्थेचीही आणि आयुष्याच्या जोडीदाराचीही !